Breaking News

रात्रीचे भारनियमन सुरू केल्याने संताप

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - वैजापूर तालुक्यातील वीरगाव परिसरात 5 ऑक्टोबर पासून महावितरणने दिवसाचे भारनियमन कमी करून सायंकाळी पाच ते रात्री अकरा असे भारनियमन सुरू केल्याचे पत्र काढले आहे. महावितरणच्या या निर्णयाचा शेतकर्‍यांनी तीव्र निषेध करत भारनियमनाची वेळ पुर्वीचीच ठेवावी अशी मागणी केली आहे.. शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात रात्री-अपरात्री जावे लागते. रात्री विद्युत पुरवठा खंडीत असल्यास साप, विंचू आदींपासून धोका वाढतो, शिवाय चोर्‍यांतही वाढ होते. यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करून पुर्वीप्रमाणे विद्युत पुरवठा सुरू करावा असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. नवीन भारनियमन वेळेच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला आहे. याविषयीचे निवेदन धनंजय धोर्डे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष गणेश सावंत यांनी गुऊश्‍वारी वैजापूर उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता प्रकाश तौर यांना दिले. यावेळी तौर म्हणाले की, आम्हाला वरिष्ठ अधिकार्यांचे आदेश आहेत, हा निर्णय आमचा नाही. यावर धनंजय धोर्डे म्हणाले की, भारनियमनाच्या वेळेत बदल केला नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल.