हज यात्रेवरील अनुदान कालांतराने रद्द होणार - मुख्तार अब्बास नक्वी
मुंबई, दि. 08, ऑक्टोबर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान टप्प्याटप्प्याने रद्द होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. नक्वी दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.
2012 ला हजवरील अनुदान रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने नव्या धोरणानुसार हज यात्रेवरील अनुदान रद्द करण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अनुदान रद्द झाल्यानंतर यात्रेसाठी अनुदान म्हणून देण्यात येणार्या रक्कमेचा वापर मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी करण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.