Breaking News

जप्त वाळू साठे चोरीला जाण्याच्या भितीने विश्रामगृह परिसरात हलविले

परभणी, दि. 01, नोव्हेंबर -  वाळू माफियांकडून जप्त केलेले वाळू साठे निर्ढावलेले माफिया चोरून नेतील या भीतीने प्रशासनाने चक्क शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हलविले  आहेत. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, मैराळ सांगवी, खळी, दुस्सलगाव, महातपुरी तांडा, गंगाखेड शहर, कासारवाडी परिसर, झोला, पिंपरी, मसला, धारखेड, मुळी, गौंडगाव,  भांबरवाडी आदी परिसरात वाळूमाफियांनी गोदावरी नदीत तयार केलेले बे कायदेशीर वाळू साठे प्रशासनाने जप्त करून लिलाव पुकारला. मात्र यातील काही साठ्यांना आश्‍चर्यकारक पणे बोलीच बोलली गेली नाही. माफियांकडून या साठ्यांना धोका असल्याने हे साठे प्रशासनाने स्वत: उचलून शासकीय कामावर ठेकेदारांना देण्याचा निर्णय घेतला व हे साठे सावध गिरी म्हणून शासकीय विश्रामगृहाच्या आवारात हलविले आहेत.