Breaking News

भारनियमन बंद करा अन्यथा ठिय्या आंदोलन...!

स्वाभिमानी युवा आघाडीचा इशारा

बुलडाणा, दि. 06, ऑक्टोबर - दिनांक 5 ऑक्टोबर रोजी विद्युत वितरण उपकार्यकरी अभियंता यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये भरनियमाचा विरोध करत नमूद केले आहे की गेल्या  काही दिवसांपासून देऊलगावराजा तालुक्यात विषशतःग्रामीण भागात सिंगल फेज गावठाण फिटर वर रोज सकाळी 6 ते9 वर रात्री 7 ते 10 असे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ऐन परीक्षेचे दिवस असल्याने मुलांना अभ्यासपासून वंचित राहावे लागत आहे. अशा अनेक समस्यांचा ग्रामीण जनतेला मात्र विनाकारण त्रास देण्यात येत आहे असा घणाघाती आरोप ही सदर निवेदनात केला आहे.
येत्या दोन दिवसात जर भारनियमन बंद झाले नाही नंतर बुलढाणा येथे ह्या कार्यप्रणालीचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी बुलडाणा यांच्या वतीने स्थानिक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी चे सतीश मोरे,गजानन मुन्ढे, विष्णू देशमुख, पंढरीनाथ म्हस्के, बाबुराव शिंदे, रमेश नरोडे, दिगांबर शिंदे, विष्णू शिंदे, लिंबाजी आमटे सहित इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.