Breaking News

टीम इंडियाला केदार जाधवकडून मेजवानी

पुणे, दि. 24, ऑक्टोबर - भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने टीम इंडियाला आपल्या पुण्यातील घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी जाधव कुटुंबियांनी कर्णधार  विराट कोहलीसह भारतीय संघाला खास महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी दिली.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वन डे सामना  (25 ऑक्टोबर) पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया काल पुण्यामध्ये दाखल झाली. तेव्हा केदार  जाधवनं टीम इंडियाला आपल्या नव्या घरी भोजनासाठी  बोलावलं होतं. यावेळी विराट कोहली आणि टीम इंडियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
केदार जाधवच्या घरी भारतीय क्रिकेटपटू येणार अशी कुणकुण लागताच तिथे चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. खेळाडूंना घेऊन गाडी येताच गर्दी वाढली. मात्र पो लिसांनी गर्दीतून वाट काढत खेळाडूंना केदारच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचवलं.