Breaking News

चित्रपट दिग्दर्शक राम मुखर्जी कालवश

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांनी आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतला. ते 84 वर्षांचे  होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. दुपारी विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुखर्जी यांना रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. जुन्या काळातील निवडक दिग्दर्शकांपैक ी ते एक होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. राम मुखर्जी यांनी हिंदी बरोबरच बंगाली भाषेतील अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. हम  हिंदुस्तानी, लिडर, राजा की आएगी बारात या चित्रपटांची राम मुखर्जी यांनी निर्मिती केली होती.