Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात 95 टक्के सरपंच शिवसेनेचेच - खा. विनायक राऊत

रत्नागिरी, दि. 13, ऑक्टोबर - रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या मावळ्यांनी हा गड अभेद्य राखला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने  आपली ताकद दाखविली आहे. ग्रमपंचायत निवडणुकीतही जिल्ह्यातून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीला हद्दपार करीत 95 टक्के सरपंच शिवसेनेचेच होतील, असा विश्‍वास खासदार  विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यातल्य 222 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या सोमवारी (दि. 16 ऑक्टोबर) होणार आहेत. निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज  रत्नागिरीत शिवसेनेचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.
रत्नागिरीतील शिवसैनिकांनी भगवा अखंड फडकवत ठेवला आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची ताकद सर्वांना  दिसेल. रत्नागिरी राज्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा होणार असल्याची खात्री खासदार यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील 95 टक्के सरपंच शिवसेनेचे, तर उर्वरित 5 टक्के सदस्य गाव  पॅनलचे होणार आहेत. तेही आमच्या समवेत येतील. अन्य पक्षांना कोणतेच स्थान मिळणार नाही, असेही श्री. राऊत यांनी सांगितले.