Breaking News

उजनीचे दरवाजे तब्बल 49 दिवस खुले

बारामती, दि. 24, ऑक्टोबर -  उजनी धरणाच्या निर्मितीनंतर अनेक पावसाळे व दुष्काळ उजनीने पाहिले आहेत. अनेक सुकाळ व दुष्काळ आले. अनेक वेळा उजनीच्या  पाण्यावरुन जिल्ह्या-जिल्ह्यात वाद झाले. त्यामुळे उजनी धरण नेहमीच चर्चेत राहिले. पण यंदाच्या दमदार पावसामुळे मागील दहा वर्षाच्या इतिहासात उजनीने विक्रम केला आहे.
यंदाच्या दमदार पावसामुळे 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे ठेवावे लागले आहेत. 28 ऑगस्ट 2017 पासून ते (काही अपवाद वगळता) कालपर्यंत 23 ऑक्टोबर 2017 पर्यंत  म्हणजेच 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे राहिले असून, यातून तब्बल 89.10 ढचउ पाणी सोडावे लागले आहे. यंदाच्या पावसामुळे धरणातून जेवढे पाणी सोडावे लागले आहे, त्या  पाण्यात उजनी धरण दीड पट भरले असते. या अगोदर 2006-07 साली झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला होता, त्यावेळीही धरणातून तब्बल 300 ढचउ पाणी  सोडावे लागले होते. त्यावेळीही 67 दिवस दरवाजे उघडे ठेवावे लागले होते.