Breaking News

पावसाने मोडले नगर जिल्ह्याचे मागील 36 वर्षांचे रेकॉर्ड

परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धरणे ओव्हरफ्लो, यंदा कोसळला विक्रमी पाऊस

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - नगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मेहेरबान झालेल्या वरूणराजाने खूपच मोठी कृपा केली आहे.मागील 36 वर्षातील जिल्ह्याच्या पावसाचे रेकॉर्ड  यंदाच्या पावसाने मोडले आहे.परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली असून सर्व नद्या देखील दुथडी भरून वाहात आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे मागील 36 वर्षांमधील सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत.यंदाच्या वर्षी आतापर्यंत सुमारे 777 मिलीमिटर पाऊस जिल्ह्यात झाला आहे.टक्केवारीप्रमाणे  पाहिले तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तब्बल 160 टक्के इतका प्रचंड पाऊस झालेला आहे.1991 पासून 2017 पर्यंतच्या 36 वर्षांमधील पावसाचा विचार केला असता  यापूर्वीच्या कालखंडात 1998 साली सर्वाधिक म्हणजे 776 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.त्यानंतर 2010 मध्ये त्या खालोखाल म्हणजे 771मलीमिटर पाऊस झाला होता.  जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या 5 महिन्यांच्या कालावधीत साधारणपणे 300 ते 400 मिलिमीटर इतका पाऊस होतो.जिल्ह्यातील तालाकानिहाय पावसाचे प्रमाण पाहिले तर यंदाच्या  वर्षी अकोले व जामखेड या दोन तालुक्यांमध्ये 1000 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.जास्त पावसासाठी प्रसिध्द असलेल्या अकोले तालुक्यात नेहमीच पाऊस जास्त  होतो.मात्र यावर्षी अकोले तालुक्यात 1 हजार चा आकडा ओलांडला आहे.जामखेड तालुक्यात देखील 1015 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे.हा पाऊस म्हणे सरासरीच्या  165 टक्के इतका पाऊस आहे.2005 ते 2010 या सहा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात सलगपणे 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे.या काळात जिल्ह्यात पिकांचे उत्पादन  तसेच दूध उत्पादन देखील चांगले होते.मात्र 2010 ते 2015 या कालावधीत केवळ एकच वर्ष 100 टक्क्यांपेक्षा जास्त तर उर्वरित चार वर्षे अत्यल्प पाऊस झाला.त्यामुळे जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणावर चारा,पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता.तसेच पिकांचे व त्यातही विशेषत: ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणार घटल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना  त्याचा मोठा फटका बसला होता.ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता नसल्याने साततने प्रत्येक वर्षी नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर  पाण्याचे टँकर सुरू करावे लागले होते.
धरणांमध्ये पाणी साठी मर्यादित असल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणी केवळ पिणसाठीच आरक्षित करण्याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागली.त्यातच मराठवाड्यातील जायक वाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीवरून मराठवाड्यातील जनता विरूध्द नगर व नाशिक जिल्ह्यातील जनता असा संघर्ष देखील सलगपणे उभा राहिला होता.या पार्श्‍वभूमीवर  यंदाच्या वर्षी पावसाने मागील पावसाचे सर्वच विक्रम मोडून काढीत जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे.त्यामुळे आता जिल्हा पाणीदार झाला असून गावेगावी मोठ्या प्रमाणावर  पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी देखील आनंदी आहेत.