34 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर; ईश्वर चिठ्ठीने दोघांची निवड
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - साधारण गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हात सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीचे रणधुमाळी सोमवारी (दि.9) निकालामुळे शांत झाली. यात औरंगाबाद तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीची मतमोजणी शहरातील लेबर कॉलनीमधील ग्रामरक्षक दल समादेशक कार्यालयात झाली. लाबकाना, चारठा आणि कौटगाव अंबर येथून सरपंचाची निवडपूर्वीच बिनविरोध झाली होती. त्यामुळे सोमवारी 32 ग्रामपंचायतीची मोजणी प्रकिया शांततेत झाली. औरंगाबाद तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान झाले होते. सोमवारी उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसील सतिश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ग्रामरक्षक दल समादेशक कार्यालयात सकाळी दहापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. यात 16 टेबलवर प्रत्येकी दोन अशा 32 ग्रामपंचायतीची मोजणी झाली. मतमोजणी परिसरात सकाळपासून यात्रेचे स्वरुप आले होते. निवडणूक असलेल्या गावासह
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येश उपस्थित होते. त्यामुळे एक-एक निकाल घोषित होत असताना कार्यकर्ते आणि विजयी उमेदवार ज ल्लोष करताना दिसत होते. यात लाबकाना, चारठा येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यासह सरपंचद तर कौटगावअंबर गावातून सरपंचाची बिनविरोध निवड झाली
होती. सोमवारच्या मतमोजणीत सेलूद ग्रामपंचायत सदस्यासाठी शहा समीबी नबी शहा आणि शहा तन्नाजबी आय्युब शहा यांना प्रत्येकी 186 मते पडली होती. तसेच कार्होळमध्ये अशोक अंबिलढगे व गंगाधर अंबिलढगे यांना प्रत्येकी 128 मते होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने गंगाधर अंबिलढगे, शहा समीबी नबी शहा विजयी ठरल्या.