Breaking News

बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी 2 कोटी रूपयांचा ऐवज लुटला

नवी मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - एका व्यापा-याच्या घरी सशस्त्र दरोडा पडला असून दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 2 कोटी रूपयांचा ऐवज लंपास  केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. अरूण मेनकुदळे असे या व्यापा-याचे नाव आहे. 
कुरीअर एजेंट असल्याचे सांगत 6 दरोडेखोर मेनकुदळे यांच्या घरात शिरले. यानंतर त्या दरोडेखोरांनी मेनकुदळे आणि त्यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून घरातली  रक्कम आणि दागिने लुटून नेले. या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश होता.