Breaking News

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीला 20 सुवर्णपदके

रत्नागिरी, दि. 01, नोव्हेंबर - स्विमिंग फेडरेशन इंडिया आयोजित राष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रत्नागिरीतील जलतरणपटूनी बावीस पदकांची लयलूट केली. त्यात  20 सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे.
नांदेड येथे झालेल्या या जलतरण स्पर्धेत देशभरातील शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. रत्नागिरीतून डॉ. निशिगंधा पोंक्षे, शंकर मिलके, अश्‍विनी नलावडे आणि चिपळूणच्या माधवी  साठे सहभागी झाल्या होत्या. डॉ. पोंक्षे यांनी 50 वर्षावरील गटात सहा सुवर्ण पदके मिळविली. मिलके यांनी 75 वर्षावरील गटात दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.  नलावडे यांनी 40 वर्षावरील गटात सहा सुवर्णपदके, तर श्रीमती साठे यांनी 75 वर्षावरील गटात 6 सुवर्णपदके मिळविली. विशिष्ट वयोगटातील खेळाडूंसाठी दरवर्षी ही स्पर्धा आयो जित केली जाते. रत्नागिरीच्या संघाने या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.