Breaking News

2004 साली सापडलेली स्फोटके निकामी करण्यासाठी लष्कराचे जवान कळंबोलीमध्ये

पनवेल, दि. 06, ऑक्टोबर - कळंबोलीमध्ये 2004 साली सापडलेली 3 टन स्फोटके निकामी करण्यासाठी पुण्यातून सैन्य दलाचे जवान आणि कळंबोली पोलीस  घटनास्थळी दाखल झाले आहे. तब्बल 13 वर्षानंतर अखेर आज स्फोटके निकामी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 साली तीन कंटेनरमधून 3 टन दारुगोळा जप्त करण्यात आला होता. या स्फोटकांमध्ये रॉकेट लाँचर, हॅण्ड ग्रॅनाईट,  हातबॉम्ब आणि अन्य दारुगोळ्याचा समावेश आहे. स्फोटके निकामी करताना जिवीतहानी होवू नये यासाठी सुरुवातीलाच विशेष उपाय योजना हाती घेण्यात आल्या  आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पनवेलजवळील मोसारा हे गाव रिकामे करण्यात आले आहे.