Breaking News

विशेष 16 निवासी शाळा महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणार

पुणेे, दि. 06, ऑक्टोबर - वेगाने वाढत असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्याकरिता हजारो बांधकाम मजूर घाम  गाळत आहेत. तसेच रस्त्यावर राहणा-या नागरिकांची अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता विशेष 16 निवासी शाळा महापालिकेच्यावतीने सुरू  करण्यात येणार आहेत. यासाठीच सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुणे महापालिकेतर्फे राबवण्यात  येणार्‍या मागासवर्गांबाबत महापालिकेत मध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीला उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त  आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व घटकांमधील मुलांना शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकाम मजूर हे कामाच्या निमित्ताने सतत स्थलांतर करीत  असतात, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. महापालिका, नगरपालिकांनी त्यांच्या भागातील शाळाबाहय मुलांचे मागील वर्षी सर्व्हेक्षण  करण्यात आले होते. तेव्हा पुणे शहरात 10 हजार शाळाबाहय मुल असल्याचे आढळून आले होते. या पार्श्‍वभुमीवर पालिकेच्या बंद असलेल्या 16 शाळांच्या इमारतीची  दुरुस्ती करून या मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्या संदर्भतील विस्तृत अहवाल येत्या 13 तारखेला होणार्‍या बैठकीत  मांडण्याच्या सूचना उपमहापौरांकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.