Breaking News

नाशिक जिल्ह्यात दोन वर्षात 13 हजार कुटुंबांना हक्काचे घरकुल

नाशिक, दि. 01, नोव्हेंबर - घरकुल योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात 13 हजार 251 कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळाले आहे. त्यापैकी 6 हजार 926 घरकुल इंदिरा आवास  योजनेअंतर्गत तर 4 हजार 798 घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आले आहेत.
दिरा आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर किंवा कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो. 2013-14 पासून घरकुलाची किंमत एक  लाख रुपये करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून 95 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत 2015-16 मध्ये सर्वाधिक 742 घरकुल दिंडोरी  तालुक्यात बांधण्यात आले आहेत. बागलाण तालुक्यात 661, कळवण 658, सुरगाणा 591आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात 596 घरकुल बांधण्यात आले आहेत.
पंतप्रधान आवाअंतर्गत दारिद्र्यरेषा हा निकष नसून सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षण 2011 नुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. 1 एप्रिल 2016 पासून बेघार  आणि पक्के घर नसणार्‍या चार हजार 945 कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून हक्काचे घरकुल मिळाले आहे. लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी पहिला हप्ता अग्रीम स्वरुपात आणि  त्यानंतर तीन हप्त्यात घरकुलाचे अनुदान त्याच्या बँक खात्यात जमा केले जाते. चौदा हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला  आहे.
सद्यस्थितीत केंद्रशासनाकडून लाभार्थ्यास घर बांधण्यासाठी एक लाख 20 हजार अनुदान देण्यात येते. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामासाठी  मनुष्य दिवस उपलब्ध करून दिले जातात. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी 12 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
या योजनेअंतर्गत बालगलाण तालुक्यात 423, चांदवड 224, देवळा 100, दिंडोरी 698, इगतपुरी 177, कळवण 407, मालेगाव 533, नांदगाव 209, नाशिक 324, निफाड  369, पेठ 217, सिन्नर 154, सुरगाणा 406, त्र्यंबकेश्‍वर 276 आणि येवला तालुक्यात 261 कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळाले आहे.
याशिवाय अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेतून 2016-17 मध्ये 509 लाभार्थ्यांना तर शबरी घरकुल योजनेतून एक हजार अनुसुचित जमाती लाभार्थ्यांना  घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. पारधी घरकुल योजनेतूनदेखील अनुसुचित जमातीच्या 9 लाभार्थ्यांना घरांसाठी अनुदान देण्यात आले असून त्यांना हक्काचे घर मिळाले आहे.