Breaking News

ठाणे शहराचा पाणीपुरवठा 13 ऑक्टोबर रोजी बंद

ठाणे, दि, 12, ऑक्टोबर - महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्या 1590 मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या अत्यावश्यक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने 13 आ ॅक्टोबर, 2017 रोजी 00.00 ते 24.00 वाजेपर्यंत (24 तास) शिळ टाकी येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा प्रभाग समितीमधील गणपतीपाडा, विटावा व  कळव्याचा काही भाग इत्यादि परिसराचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे.
तसेच ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिसे येथील पपिंग स्टेशनच्या सब स्टेशनमध्ये दिनांक 08/10/2017 रोजी विज पडल्याने झालेल्या खराबीचे  दुरुस्तीसाठी तसेच पाणी वितरण जलवाहिन्यांवरील एअर व्हॉल्वस, गळतीची दुरुस्ती करण्याकामी दिनांक 13.10.2017 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत  पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहील. त्यामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाऊण्ड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, ऋतूपार्क, उथळसर इत्यादी ठिक ाणचा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 13.10.2017 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत बंद राहील.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने  या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.