Breaking News

कौशल्य विकास कार्यशाळेच्या माध्यमातून 100 युवकांना नोकरीची संधी

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर -  प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण दडलेले असतात,पण त्यांना वाव मिळत नाही.त्या गुणांना वाव मिळण्यासाठी युवक-युवतींचे आयुष्यच बदलण्यााठी क ौशल्य विकास कार्यशाळा यासाठी एक पर्याय आहे. या कार्यशाळेमधून 100 युवक-युवतींनी कायमस्वरुपी नोकरी मिळाली असल्याचे प्रतिपादन प्रोजेक्ट हेड योगेश भुसा यांनी केले.
नगर येथील युवक-युवतींना मोफत स्किल डेव्हलमेंट तात्रिक प्रशिक्षण घेऊन 100 टक्के नोकरीची हमी देत एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा पद्मशाली युवा शक्ती व ग्लोबलरिच  स्किल ट्रेनिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.या कार्यशाळेसाठी 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.योगेश भुसा म्हणाले की,या क ार्यशाळेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.यामध्ये विविध 630 कोर्सेस असून,नगर जिल्ह्यात 29 सेक्टर उपलब्ध आहेत.शैक्षणिक पात्रता 8 वी पास ठेवली असून,12 ते 45 वर्ष  वयोगटातील स्त्री,पुरुष यांना ही संधी मिळत आहे.तरी या कार्यशाळेमुळे सर्व समाजातील गोर-गरीब युवक-युवतींना चांगली संधी मिळत आहे.प्रारंभी श्रीराम राजेश्‍वर यांनी प्रास्ताविकात  पद्मशाली युवा शक्तीच्या माध्यमातून करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.संघटनेने गरीब विद्यार्थ्यांचा सर्व्हे करुन घरी जाऊन हजारो वह्या-पुस्तके वाटप केले.शासकीय योजनांचा लाभ  पद्मशाली समाजाला मिळवून देण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न करीत आहे.समाज जागृती,युवकांचे संघटन अशी कामे या युवा शक्तीच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.या क ार्यशाळेसाठी ग्लोबलरिच स्किल ट्रेनिंग इंडियाचे प्रोजेक्ट हेड योगेश भुसा,जिल्हा समन्वयक निलेश झरकर,अ‍ॅटोप्लास्टचे संचालक देशमुख सर,सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय संस्थेच्या विजया  काळे,डॉ.कृणाल कोल्हे,सागर गायकवाड,आडम मॅडम आदिंचे सहकार्य लाभले.रवि दंडी यांनी आभार मानले.