Breaking News

मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन

पुणे, दि. 06, सप्टेंबर - पुण्याचे ग्रामदैवत अर्थात पहिला मानाचा कसबा गणपतीचे 4 वाजून 1 मिनिटाला विसर्जन करण्यात आले. थोड्यात वेळात इतर चारही  मानाच्या गणपतीचे विसर्जन होईल. यंदा पुण्यात गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री, महापौरांच्या हस्ते  पूजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे. सुरेश कलमाडीही मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.पुण्यातील रस्त्यांवर सुबक रांगोळ्या  काढण्यात आल्या आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळनंतर सुरु होईल. चिंचवडमध्ये चापेकर चौकातील विसर्जन मिरवणूक संथ गतीने  सुरू आहे. संध्याकाळी पावणेसहापर्यंत केवळ 15 मंडळांचा मिरवणुकीत सहभाग होता.
विजर्सन मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही चोख नियोजन केले आहे. यासाठी शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद  ठेवण्यात आले आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीवर 1200 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. तसेच 7 हजार 500 पोलिस, महिला आणि वाहतूक  पोलिसांची विशेष पथके तैनात आहेत. यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा असे आवाहन  वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सुप्रीम कोर्टाने हा आदेश रद्द केला. परिणामी मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत  लाऊडस्पीकर व ढोल-ताशांचा गजर निनादण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.