Breaking News

पठाणकोटप्रमाणे अन्य सैन्याच्या तळावर हल्ला होण्याचा इशारा- बी.एस.धनोआ

बंगळुरू, दि. 11, सप्टेंबर - पठाणकोट येथील लष्कराच्या तळा झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच देशातील अन्य लष्करी तळावरदेखील हल्ला होऊ शकतात,  असा इशारा हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी दिला. बंगळुरुमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सिमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी पठाणकोट हवाई दलाच्या ठिकाणावर 2 जानेवारी 2016 रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते तर  10 दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश आले होते. या हल्ल्यानंतर हवाई दलाने आपली सुरक्षा क्षमता वाढवली असून अशा प्रकारच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी  हवाई दलातर्फे सैन्याला खास प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे धनोआ यांनी सांगितले.