Breaking News

कमिन्स कंपनीतील माल चोरल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा, दि. 11, सप्टेंबर - सुरवडी, ता. फलटण गावचे कमिन्स कंपनीमधील पीजीबीयु एसइझेडमधील स्क्रप यार्डमधुन विना परवाना नजर चुकुन मुद्दाम लबाडीने  80,200/- रुपये किंमतीचा माल चोरुन नेल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कमिन्स कंपनीच्या स्क्रप यार्डमधील मोहम्मद हमीद कादरी उर्फ बादशहा कादरी रा.बारामती याने त्याचा ताब्यातील ट्रक क्र.एम.एच 12  क्यु 9999 व एम.एच 11 ए 5913 यामध्ये इलेक्ट्रीक जुन्या बटरी अल्युमिनीअम जुने रेडिटर व कोअर, प्लस्टिकचा जुना बीन, जुन्या केबल वायरी आतमधे तांबे  असलेली तार इतर लोखंडी भंगार वस्तु असा एकुण 80,200/- रुपये किंमतीचा माल विनापरवाना नजर चुकवुन, मुद्दाम लबाडीने चोरुन नेत असताना मिळुन  आला असुन याची फिर्याद बापु सुळे यांनी दिली असून अधिक तपास पो. ना. धराडे हे करीत आहेत.