Breaking News

राज्यात वीज कंपन्यांना कोळसा अपुरा

धुळे, दि. 15, सप्टेंबर - वीजनिर्मिती कंपनी महाजेनकोकडे चार दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध आहे. कारण ज्या कंपनीकडून महाजेनकोला कोळसा पुरवला  जातो, त्याच कंपनीकडे कोळशाचा तुटवडा आहे. मात्र केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्‍न लवकरच निकाली निघेल, अशी माहिती ऊर्जामंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील भारनियमन हे तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याचा पुनरुच्चार चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात केला. मात्र असं असलं तरी कोळशाची आवक कमी झाल्याने  ही परिस्थिती उदभवली. वीज सर प्लस असली तरी मागणी आणि पुरवठा यातील तफावत बघता राज्यात सरसकट भारनियमन नाही. ज्या भागांमध्ये वीज बिलं  थकीत आहेत, वीज गळतीचं प्रमाण जास्त आहे, अशाच भागात भारनियमन केलं जात आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.