Breaking News

भारतीयांना पंतप्रधान मोदी, गोपूजेपासून लवकरच मुक्त करु - झाकिर मुसा

श्रीनगर, दि. 01, सप्टेंबर - भारतातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंच्या गो पूजा राज्यातून लवकरच मुक्त करु’ अशी दर्पोक्ती अल- कायदाचा  काश्मीरमधील प्रमुख झाकीर मुसाने एका ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून केली आहे . 
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने देशभरात बेकायदेशीररित्या राहणार्‍या सुमारे 40 हजार रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील  सहा हजार रोहिंग्या मुस्लिम हे जम्मूमध्ये राहतात. त्या विरोधात झाकीर मुसाने ही ध्वनीचित्रफित प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कितीही प्रयत्न केले तरीही ते आम्हाला थोपवू शकणार नाही. भारताच्या भूमीवर इस्लाम धर्माचा झेंडा रोवू आणि हिंदू राज्यकर्त्यांना गुलामीचे जीवन जगावे  लागेल,असेही मूसाने म्हटले आहे.