Breaking News

कचरा प्रकल्पाविरोधात शिवसेनेच्या वतीने जनजागृती पदयात्रा व महाजागर

पुणे, दि. 25, सप्टेंबर - हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. भाजप वगळता सर्वपक्षीय  लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या कचरा प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी आज शिवसेनेकडून ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग येथून  पदयात्रेस सुरुवात करून पदयात्रेचा समारोप गांधी चौक, हडपसर गाव येथे करण्यात आले. सत्ताधार्‍यांना सद्बुद्धी मिळो, यासाठी गांधी चौक येथे आदिशक्तीचा जागर  करण्यात आला.
येथील स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रामटेकडी येथे बायोएनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड हा कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सत्ताधारी भाजप ठाम आहे.  भाजप व्यतिरिक्त सर्वपक्षीयांचा या कचरा प्रकल्पाला विरोध आहे. गेले अनेक दिवस येथील नागरिक या प्रकल्पास विरोध करीत आहेत. शिवसेनेच्या वतीने  महानगरपालिकेच्या सभागृहात व स्थानिक पातळीवर कायम विरोध केला आहे. या कचरा प्रकल्पाविरोधात जनजागृती करण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात  आले आहे.