माणसा-माणसात जाणीव जागृती करणे आवश्यक : श्याम मानव
जळगाव, दि. 11, सप्टेंबर - आज विवेकशील समाज निर्मितीकरिता माणसा-माणसात जाणीव जागृती करणे गरजेचे झाले आहे. युवापिढीच्या खांद्यावर याची धुरा असेल तर निश्चितच सकारात्मक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन मूळजी जेठा महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टीकोण’ विषयावर आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केले. 21 व्या शतकात देखील आपल्या समाजाला बुआ-बाजी, अंधश्रद्धा याची कीड आतून पोखरत आहे. यामुळे कितीतरी व्यक्ती, कुटुंब, सामाजिक समूह उद्धस्त झालेत. यासंदर्भातील घटना रोज वर्तमान पत्रात वाचून मन सुन्न होते.याच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक स्तरावरून प्रयत्न झाले पाहिजेत, असेही ती यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा म्हणून बुआ-बाजी, जादूटोणा, करणी, भुताटकी, चकवा या गोष्टी विषयी केलेल्या जागृती कार्यक्रमाचे अनेक दाखले दिलेत, जादूटोणा विरोधी कायद्यावर भाष्य केले आणि काही वैज्ञानिक प्रात्याक्षिके करून दाखवलीत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी उपस्थित होते, कार्यक्रमाची प्रस्तावना विभाग प्रमुख डॉ. जयश्री महाजन यांनी केली, सूत्रसंचालन प्रा. सागर बडगे यांनी केले तर कार्यक्रमाला असंख्य प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्येकर्ते उपस्थित होते. तसेच विभागातील प्रा.समाधान कुंभार, प्रा.कांचन देसले व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.