वाटेगावात महिलेचा खून; पतीला अटक
सांगली, दि. 11, सप्टेंबर - वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून पूनम दादासाहेब साठे (वय 28) हिचा पती दादासाहेब चंद्रकांत साठे (वय 30) याने गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कासेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून पतीस अटक केली आहे. वाटेगाव येथे राहणार्या दादासाहेब साठे याचा बेळगाव येथील पूनम साठे हिच्याशी आठ वर्षापूर्वी विवाह झाला होता. या दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दादासाहेब साठे हा कराड येथे वेल्डिंगच्या दुकानात कामास होता. या पती- पत्नीत गेल्या काही दिवसापासून किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होता. मात्र प्रत्येकवेळी सासर व माहेरचे लोक या दोघांची समजूत काढत होते.
मात्र या दोघात बुधवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा वाद झाला. त्यावेळी दादासाहेब साठे याने पूनम साठे हिच्या तोंडावर उशी दाबून व गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर गुरूवारी दिवसभर दादासाहेब साठे याने घराच्या दरवाजाचे कुलुप उघडले नाही. परंतु अचानकपणे सर्वच नातेवाईकांना पूनम साठे हिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. काही नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला व कासेगाव पोलिसांशी संपर्क साधला.
या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक किशोर काळे व कासेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी दादासाहेब साठे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.