Breaking News

पंकजा मुंडे यांची नामदेव शास्त्रींना शेवटची विनवणी?

। भगवानगडाच्या समेटासाठी अर्जुन शिरसाठ यांचे प्रयत्न

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा विषय आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक व कौटुंबीक  नात्याची झालर देउन  हाताळण्यास सुरवात केल्याची दिसते. त्यांनी गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांना दिलेले पत्र चर्चेचा विषय ठरले आहे. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील मुंडे समर्थकांची  एक बैठक पार पडली.
 राजकीय व्यक्तींना भाषण बंदीचा निर्णय महंतानी घेण्यामागे पंकजा मुंडे यांना राजकीयदृष्टया रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समर्थक करीत आहेत. त्यानुसार  गडावर मेळावा व्हावा यासाठी  समर्थकांनी संताप व्यक्त केला.
 विविध गावामध्ये बैठका होउन दसरा मेळाव्यापुढे पंकजा मुंडे यांना बोलु दयावे अशी आग्रही मागणी होत असतानाचदुसरीकडून मंहत नामदेव शास्त्री यांच्या  समर्थकांनीही  भगवानगडावर कोणत्याही परिस्थितीत राजकीय सभा होऊ द्यायची नाही, असा आक्रमक पावित्रा घेतल्याने स्थानिक प्रशासनावर दबाव वाढत  आहे.
मिळालेल्या माहितीनुसार  नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद  समाजकल्याण समितीचे माजी सभापती अर्जुन शिरसाठ  यांनी आज सकाळी भगवानगड येथे जाऊन पंकजा मुंडे यांचे  पत्र महंताना देउन  चर्चा केली.पण त्याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र पत्र वाचून नंतर बोलू  एवढीच प्रतिक्रिया मंहतांनी  त्यांनी दिली . याबाबत महंताशी प्रतिनिधींनी सायंकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.
ना.पंकजा मुंडे यांना सुमारे तीन वर्षापूर्वी महंतानी गडाची कन्या म्हणुन घोषित केले. त्या नात्याचा अचूक वापर करत पंकजा  मुंडे यांनी माहेरची भेट म्हणुन भावनिक  अवाहन केले. पहिली अन् शेवटची विनंती करत भावनीक दबाव वाढवुन समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. शेवटची विनंती या शब्दामुळे समर्थक मात्र संभ्रमात  पडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भगवानगड, पंकजामुंडे व नामदेव शास्त्री हे चर्चेचा विषय ठरले आहे. गेल्यावर्षी याच मुद्यावरुन वातारण तापवण्यात आले होते. परंतु  कोणत्याही दबावाला बळी न पडता महंत शास्त्री यांनी भगवागडावर मेळाव होवू दिला नाही. प्रशासनही महंत शास्त्री यांच्या मागे खंबीर उभे राहिले होते.
पंकजा मुंडे यांचे पत्र
पंकजा मुंडे यांच्या नावाने देण्यात आलेल्या पत्रात मुंडे यांनी म्हटले आहेकी,  आपल्यात नेमके काय झाले, या प्रश्‍नाचे  उत्तर माझ्याकडे नाही पण आपली लेक  पहिली अन् शेवटची विनंती करत आहे. लोकांची तळमळ बघून मध्यस्थ कुणी नका े असं आपण ठरवलं .काही नको आपल्या लेकरांना ( भाविकांना ) वर्षातून फक्त  वीस मिनीटे वेळ दया . ते गरीब कोयता घेउन राबायला जातील अन् मी सुध्दा परत येणार नाही. कष्टकरी माणसाचा स्वाभीमान वाढवणं आपल्याला जमलं तर   करावं पण तो हिरावून घेउ नये हे नक्की. मी कुणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते.  दिवाळीची माहेरची भेट म्हणून तेवढे क्षण ( मेळाव्यापुढे  भाषण ) मला दया,समाज बांधण जमलं नाही तर तो तोडणं तरी  आपण होऊ देउ नये . भक्तांना म्हणजे कोणत्याही माझ्या भावाला त्रास होऊ नय,े त्यांच्या भावना  जपण्यासाठी कृपया  सकारात्मक निर्णय घ्यावा. शेवटी तुम्ही व मी यांच्यामुळे ( भावीक ) आहोत . यांच्यासाठी करणं आपलं कर्तव्य आहे. अशा शब्दात  पंकजा मुंडे  यांचे पत्र महंताना देण्यात आले.