Breaking News

अपुर्‍या रॉकेल पुरवठ्याला गॅस सिलेंडरची साथ ऐन दिवाळीत साखरेची गोडी कमी

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - सद्यपरिस्तितीमध्ये  राज्यशासनाकडे विविध स्तरांमधून अनुदानित केरोसीनची मागणी केली जात आहे. परंतु केंद्रशासनाकडून प्राप्त  होणार्‍या अनुदानित केरोसीन च्या कोठ्यामध्ये वारंवार कपात होत असल्याने प्रशासनास अनुदानित केरोसीन  पुरवठा करणे शक्य नाही. यावर पर्याय म्हणून   शासनाने   5 किलो. पर्यंतचे सिलेंडर खुल्या बाजारात  उपलभ करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच या संबंधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार  पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित, स्वस्त धान्य दुकानदार,केरोसीन दुकानदार, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, आदी उपस्थित होते.
अनुदानित  केरोसीनवर   येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी व  गरजू व्यक्ती व संस्था यांना किरकोळ वापरा करता लहान गॅस सिलेंडर मिळावा यासाठी स्वस्त  धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते यांना  5 किलोंपर्यंतचे गॅस सिलेंडर विक्रीस ठेवण्याकरता परवानगी दिली आहे. आणि विशेष म्हणजे यांना कसल्याही  फॉमलिटीशिवाय संबंधित  गॅस एजन्सीकडून सिलेंडर घेता येणार आहेत.त्यानुसार एस.के.ओ.एजंट्स हे यांना सिलेंडर पुरवतील.व स्वतःही  लहान गॅस सिलेंडर  वितरित करू शकतील.  परंतु हे एस.के.ओ.एजंट्स व स्वस्त धान्य दुकानदार आणि  केरोसीन  विक्रेते  20  पेक्षा जास्त सिलेंडरची साठवणूक करू शकणार  नाहीत,असे आदेशही यावेळी दिले.