Breaking News

संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करण्याचा पालिका मुख्यसभेचा प्रस्ताव

पुणे, दि. 26, सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महमार्गावरील रस्त्याच्या 500 मीटर परिसरात दारुबंदीचे करण्यात आली आहे. यांचा  सामाजिक आरोग्यावर चांगला परिणाम होत असून ही दारूबंदी संपूर्ण महाराष्ट्रात करावी अशा शिफारशींच्या प्रस्तावाला मुख्यसभेने एकमताने मंजुरी दिली.सर्वोच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या 500 मीटर परिसरात करण्यात आलेल्या दारूबंदीची अंलबजावणी चांगल्या प्रकारे सुरु असून त्यामुळे  चांगले सामाजिक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पुणे शहरात सर्व मद्यविक्रीची दुकाने सुरु असून सर्रास दारू विक्री केली जात आहे.जागतिक आरोग्य संघटनांच्या  अहवालामध्ये तसेच नॅशनल क्राईम रिपोर्ट प्रमाणे प्रत्येक दिवसाला 15 जणांचा मृत्यू दारू सेवनामुळे होत असल्याचे समोर आले आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचा  पहिला क्रमांक आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून गुजरात, बिहार, आणि केरळ मध्ये अंशतः दारूबंदी आहे त्याच प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातही दारूबंदी करावी  असा प्रस्ताव उपमहापौर सिद्धार्त धेंडे आणि नगरसेविका सुनीता वाडेकर यांनी मुख्यसभे समोर ठेवला होता त्याला आज झालेल्या मुख्यसभेत एकमताने मंजुरी देण्यात  आली.