Breaking News

शिवसेनेच्या दोन नेत्यांतील वादावादीमुळे विसर्जनाची मिरवणूक तणावपूर्ण वातावरणात

परभणी, दि. 07, सप्टेंबर - गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी परभणीतील शिवसेनेच्या दोन नेत्यांतील वादावादीमुळे गणेश विसर्जनाची मिरवणूक तणावपूर्ण वातावरणात पार पाडली तर दुसरीकडे परभणी जिल्हयातील सोनपेठ गावातही विर्सजन मिरवणुकीत दोन गटात वादावादी झाली आज परत त्याच गटांमध्ये हाणामारी झाली असल्याचे वृत्त आहे. परभणी शहरात गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात निघाली होती.मिरवणूक शिवाजी चौकात आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यात काही कारणामुळे शाब्दिक बाचाबाची झाली.यानंतर सगळी गर्दी चौकात जमली काही कार्यकतें आणि पोलिसांनी वेळीच गर्दी पांगवली.पुर्वी एकदा पक्षाचे प्रमुख परभणीत आले असताना जाहीर कार्यक्रमाच्या वेळी या दोन नेत्यांत माईकचा ताबा घेण्यावरून शाब्दिक चकमक झाली होती आता परत गणपती मिरवणुकीत जाहीररित्या रस्त्यावर लोकांसमोर झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे एकाच पक्षातील या दोन नेत्यांती वाद सगळयांसमोर आले आहेत. या बाचाबाचीमुळे मिरवणुकीत बराच काळ तणाव होता तर सोनपेठमध्ये दोन गटात कालच्या विसर्जन मिरवणूकीच्या वेळी झालेल्या वादावादीचे आज मारामारीत रूपांतर झाल्याचे वृत्त आहे.