पान खाल्यानंतर वंदे मातरम बोलण्याचा अधिकार आहे का ?- पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - पान खाऊन थुंकल्यानंतर आपल्याला वंदे मातरम बोलण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यीं संमेलनात केला. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये केलेल्या भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
वंदे मातरम् हे शब्द ऐकल्यानंतर अंगावर शहारे उभे राहिले. मात्र, पान खाऊन पिचकारी मारायची आणि नंतर वंदे मातरम म्हणायचे हे योग्य आहे का ?, माझ्या बोलण्यामुळे अनेकांना त्रास होईल मात्र तुम्हीच विचार करा,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतात इंग्रजांचे राज्य असतानाही स्वामी विवेकानंद यांच्या वागण्याबोलण्यात कुठेही गुलामीची छाया जाणवत नव्हती. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणांतून जगाला भारताची नवी ओळख करून दिली. तसेच समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे ओढायलाही कमी केले नाही, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली.