Breaking News

ज्येष्ठ अभिनेते टॉम ऑल्टर कर्करोगाने ग्रस्त

मुबंई, दि. 12, सप्टेंबर - पद्मश्री पुरस्कार विजेते अभिनेते टॉम ऑल्टर कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त असून मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात  आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती दिली. टॉम यांना त्वचेचा कर्करोग झाला आहे. त्यांच्या  प्रकृती विषयी बातम्या देताना प्रसार माध्यमांनी संयम बाळगावा , असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.