Breaking News

काळ्या पैशाविरोधातील लढाईत सहकार्य करण्यास स्वित्झर्लंड कटीबद्ध - राष्ट्राध्यक्षा लियुथार्ड

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - काळ्या पैशाच्या विरोधात भारताकडून सुरू असलेल्या लढाईत माहितीचे आदान-प्रदान करण्याच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी  स्वित्झर्लंड कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षा डोरिस लियुथार्ड यांनी केले आहे. लियुथार्ड सध्या चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. भारत  व स्वित्झर्लंड यांच्यातील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वित्झर्लंडच्या दूतावासात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भारत एक चांगला मित्र देश आहे. या सात दशकांत आम्ही एकमेकांचे म्हणणे ऐकले, सल्ला दिला आणि एकमेकांकडून शिकलो. यामुळेच आजही दोन्ही देशांतील संबंध  कायम आहेत. भारताकडून सुरू असलेल्या काळ्या पैशाविरोधातील लढाईत सहकार्य करण्यासाठी स्वित्झर्लंडच्या संसदेची मंजूरी मिळण्याची वाट पहात आहोत,  असेही लियुथार्ड यांनी सांगितले.
या दौ-यात काळ्या पैशाविरोधातील लढाई बरोबरच अनेक क्षेत्रातील सहकार्याबाबत लियुथार्ड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली.