Breaking News

शिमल्याजवळ दरड कोसळली; तिघांना वाचवले, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - चंदीगढ-शिमला राष्ट्रीय महामार्गावर शिमला शहरापासून जवळच असलेल्या ढल्ली बोगद्याजवळ शनिवारी दरड कोसळली. या घटनेत  ढिगा-याखाली अडकलेल्या तिघांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती पोलीस अधिका-याने माहिती दिली. महामार्गावरील बोगद्याजवळ डोंगराचा भाग तुटून  महामार्गावर आला. त्यामुळे ढिगा-याखाली अनेक वाहने व माणसे अडकली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक  घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
आतापर्यंत ढिगा-याखालून तीन लोकांना वाचवण्यात आले आहे. गेले तीन दिवस येथे सतत पाऊस पडत आहे. तसेच, या महामार्गवरील वाहतूक दुस-या रस्त्याने  वळवण्यात आली आहे, असे पोलीस उपाधिक्षक रजींदर सिंग यांनी सांगितले.