Breaking News

वाळू माफियांनी केले दोन तलाठ्यांचे अपहरण

जालना, दि. 25, सप्टेंबर - अवैध वाहतूक करणारे वाळूचे टिपर जप्त करून तहसीलकडे घेवून जाणार्‍या दोन तलाठ्यांचेच वाळू माफियांनी अपहरण केले. या वाळू  माफियांनी तलाठ्यांना धावत्या टिपरमधून खाली फेकून देण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले असून पोलिसांनी या भयंकर घटनेतील  टिपर चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. 
भोकरदन तालुक्यात घटलेल्या या घटनेत तहसीलदार संगीता कोल्हे यांनी आपल्या पथकासह मोहिमेत आज अवैध वाळू वाहतुक करणारा एक टिपर पकडलाड. या  जप्त केलेल्या टिपरला तहसील कार्यालयाकडे घेवून जावून पुढील कारवाई करण्यासाठी तलाठी रामेश्‍वर कांबळे व भागवत जहाधव हे भोकरदनकडे घेवून जात होते.  त्यावेळी एका जीपने त्यांचा रस्ता अडवून दोन्ही तलाठ्यांना विे मारण्याची धमकी देत खाली उतरण्यास सांगितले. मात्र ते टिपरमधून खाली न उतरल्याने अडवणूक  करणर्‍याने टिपर चालकास खाली उतरायला लावून टिपरचा स्वत: ताबा घेतला. भरधाव टिपर चालवत तो बरंजळा रस्त्यावर नेला. तहसीलदार या टिपरचा पाठलाग  करत असल्याचे लक्षात येताच त्याने तलाठ्यांना धमक्या देत टिपरमधून खाली ढकल्याचा प्रयत्न केला. तलाठ्यांनी शिताफीने सुटका करून घेतली. भरधाव टिपरने  वाटेतील बाईकस्वार, पादचारी, बैलगाडी यांना उडविण्याचा प्रयत्न केला. हे सगळे नाट्य पाहणार्‍या लोखंडे या नागरिकाने जवखेडा ठोंबरे येथील ग्रामस्थांना कल्पना  देत टिप्परला थांबविण्यास सांगितले. ग्रामस्थांनी रस्त्यात दगड टाकून टिप्परला अडविले. चालकास ताब्यात घेवून ग्रामस्थांनीच पोलिस निरीक्षकाच्या ताब्यात दिले.