Breaking News

न्यायालयाने आरक्षण विरोधात निर्णय दिल्यास राज्यभर आंदोलन

औरंगाबाद, दि. 25, सप्टेंबर - पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात जर न्यायालयाने आमच्या विरोधात निर्णय दिला तर आम्ही महाराष्ट्रभर असहकार आंदोलन उभारू  असा इशारा महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीचे अध्यक्ष रमेश सरकटे यांनी केले ते मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केन्द्र येथे आयोजीत  पदोन्नतीतील आरक्षण बचाव मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी मेळावा आणि पुणे करार अधिकार दिन समारंभा प्रसंगी बोलत होते. यावेळी विचारमंचावर एस.के.  भंडारे, भारत वानखडे, डॉ. वाय के ठोंबरे, प्रशांत येन्डे, सी आर निखारे, बी एस खंडारे, गणेश कांबळे, शिलांत वानखडे आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना रमेश  सरकटे म्हणाले की, लवकरच मुंबईतुन आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात येणार असुन महाराष्ट्रातील सर्व अधिकारी कर्मचा-यांनी यामध्ये सहभागी व्हावे. मेळाव्याचे  सुत्रसंचालन महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीचे मराठवाडा निमंत्रक प्रा. भारत शिरसाट यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले.  यावेळी एम. डी. इंगळे, श्रीमंत कांबळे, सदांशिव कांबळे, अशोक कांबळे, श्रीरंग ससाणे, रेखा मेश्राम, रतनकुमार साळवे, सतिष पट्टेकर, दीपक केदार, बाबुराव गवई  आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.