रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर वैभव नायकवडी यांची निवड
सांगली, दि. 12, सप्टेंबर - हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांची रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीचे पत्र नुकतेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नायकवडी यांना दिले.
रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक धुरंदर नेते व व्यक्तींचा समावेश आहे. आता त्यात वैभव नायकवडी यांच्या निवडीनिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यात असलेला जिव्हाळा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडीनिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या विविध पदाधिकार्यांच्या वतीने वैभव नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला.
रयत शिक्षण संस्था व हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे पिढ्यान पिढ्या ऋणानुबंध आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नागनाथअण्णा नायकवडी यांना स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले होते .. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रयत्नातूनच रयत शिक्षण संस्थेसाठी त्या काळी भरीव देणगीही जमा करण्यात आली होती. कर्मवीर भाऊराव पाटील व नागनाथअण्णा नायकवडी यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा सांगणार्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर झालेली आपली निवड ही तळागाळातील उपेक्षित व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, अशी ग्वाही वैभव नायकवडी यांनी दिली.