Breaking News

’10 के इंटेंसिटी रन’ मॅरेथॉन उत्साहात संपन्न

पुणे, दि. 12, सप्टेंबर - छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे ’10 के इंटेंसिटी रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात खासगी  कंपन्यांतील अधिकारी आणिकर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी दहा, पाच आणि दोन किलोमीटर या प्रकारातील शर्यतीत सहभाग घेतला.
प्रारंभी प्रसिद्ध खेळाडू अंजली भागवत यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून कॉर्पोरेट कंपन्या आर्थिक मदत करत  आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक खेळणार्‍या गरजू खेळाडूंना फायदा होईल आणि येणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली असेल, असा विश्‍वास  यावेळी अंजली भागवत यांनी व्यक्त केला.
अंजली भागवत यांनी नव्या केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या क्रीडामंत्री म्हणून झालेल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. राठोड यांनी ऑलिम्पिकमध्ये  पदक पटकावले असून त्यांना खेळ आणि खेळाडूंच्या अडचणी माहित आहेत. ऑलिम्पिकमध्ये खेळाडू निवडीचा सकारत्मक परिणाम होईल असेही भागवत यांनी नमूद  केले. यावेळी हिंद केसरी काकासाहेब पवार आणि स्पर्धेचे आयोजक व पूर्व खेळाडू उपस्थित होते.