काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
श्रीनगर, दि. 02, सप्टेंबर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील बेहीबाग भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे. या भागात आणखी 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुलगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरू केली. याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्यूत्तरात एक दहशतवादी ठार झाला. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.