Breaking News

सरपंच उज्वला भोसले यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - येथील सरपंच उज्वला मछिंद्र भोसले यांना चर्मकार विकास संघाच्यावतीने आदर्श समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.  चर्मकार समाजातील गुणवंताना  समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सरपंच भोसले यांना हा  पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षा प्रीता  हरित ,   कूलाधिपती डॉ. दि. रा. गाडेकर आणि चर्मकार संघाचे अध्यक्ष संजय खामकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या संगीता  दुसुंगे, जिल्हा परिषद औरंगाबादच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लोहकरे, नगर महावितरणचे अधिक्षक अनिल बोरसे, ज्ञानेश्‍वर सहकारी साखर  कारखान्याचे उपाध्यक्ष अँड. देसाई देशमुख,  कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, सरपंच दौलतराव देशमुख, उपसरपंच भाऊसाहेब फोलाने  आदींसह सदस्य मंडळ तसेच कुकाणा ग्रामस्थांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच भोसले यांचे अभिनंदन केले.