Breaking News

छत्रपती चषक बॅडमिंटन स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - मराठा क्रीडा संघटना यांच्यवतीने प्रथमच अहमदनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती चषक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेचा शुभारंभ कोपरगांव येथील संजीवनी एज्युकेशन सं स्थेचे  सुमित कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषणात करण्यात आले. याप्रसंगी डॉ.प्रितम जपे, डॉ.महेश घोडके, संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोक नरवडे,  संयोजक व संघटनेचे सेक्रेटरी विजय पवार, अविनाश कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, क्षितीज झावरे, उदय पवार, अजय भोयर, धनंजय डहाळे, राहुल मोटे, सनी  काळे, विक्रम म्हस्के, भुषण अनभुले, विजय थोरात, प्रशांत काकडे, बाबा पिंपरकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 
पूजनानंतर या स्पर्धेचा शुभारंभ श्री.कोल्हे यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे पूजन करुन नारळ वाढवून करण्यात आले. विजय पवार बोलतांना म्हणाले, सर्वत्र खेळाचे  वातावरण आहे. सर्व समाजातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. मोबाईल, इंटनेटच्या जमान्यात तो खेळ बाजूला ठेवून मुले मैदानावर दिसावीत. खेळाडूंना  आपली कुवत कळावी व यातून भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, निश्‍चितच यातून खेळाडूंचा विकास  होईल, असे सांगून लवकरच इतरही खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या स्पर्धेस अहमदनगर जिल्ह्यातून 250 खेळाडूंनी  सहभाग घेतला होता.