Breaking News

पाशा पटेल यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाकडून जिवे मारण्याची धमकी

लातूर, दि. 25, सप्टेंबर - राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बबन भोसले यांनी अनेक असांसदीय, अश्‍लील,  बिभत्स शब्दात जिवे मारण्याची धमकी दिली असा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. भोसलेंचे हे वक्तव्य सोशल मिडियात व्हायरल झाले.  यामुळे पाशा पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन बबन भोसले आणि महाव्हाईस न्यूज पोर्टलचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे  यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
भोसले यांनी आपल्या वक्तव्यात असांसदीय, अपशब्द वापरले. सचिन अंकुलगे यांनी हा व्हिडीओ एडीट करुन महाव्हाईसवर प्रसारित केला. तो अजूनही सोशल  मिडियावर फिरत आहे. यामुळे आपला अवमान झाला. आपली प्रतिमा मलीन झाली. भोसले यांनी आपल्याला धमकी दिली यामुळे आपल्या जिविताला धोका आहे  असे पटेल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.