Breaking News

मराठवाडा विद्यापीठातील दोन प्राध्यापकांची जेएनयुत निवड

औरंगाबाद, दि. 25, सप्टेंबर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन प्राध्यापकांची निवड जवाहरलाल नेहरु विद्यापीठात करण्यात आली  आहे.जवाहरलाल नेहरु विद्यापीठात प्राध्यापकपदाची भरती प्रक्रियाराबविण्यात आली. यामध्ये राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.बी.एस.वाघमारे यांची राज्यशास्त्र  विभाग जेएनयु येथेप्राध्यापकपदी निवड झाली आहे. तर उस्मानाबाद उपपरिसरातील संचालक डॉ.अरुण खरात यांची स्कुल ऑफ लाईफसायन्सेस विभागात  प्राध्यापकपदी निवड करण्यात आली. डॉ.वाघमारे यांनी राज्यशास्त्र विभागप्रमुख, अण्णाभाऊ साठीअध्यासनाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. तर डॉ.अरुण  खरात यांनी अवॅैडमिक स्टाफ कॉलेज संचालक, जैवतंत्रज्ञानविभागप्रमुख तसेच अधिसभा सदस्य म्हणून काम पाहिले आहे. या निवडीबद्दल कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे,  विशेष कार्यसनअधिकारी डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, जेएनयु विद्यापीठातील राष्ट्रपती नियुक्त प्रतिनिधीडॉ.वि.ल.धारुरकर यांनी अभिनंदन केले  आहे.