Breaking News

धुणे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू

जालना, दि. 25, सप्टेंबर - भोकरदन तालुक्यात कस्तुरवाडी येथे धुणी धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन मुली पाण्यात पडल्याने बुडून मरण पावल्या. एकमेकींना  वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पोहता येत नसल्याने तिघीही बुडाल्या. या घटनेत मरण पावलेल्या मुलींची नावे सायमा जुम्मेखॉ पठाण (14) गजाला शेख मोईन  (19) व राणी उर्फ सुरया शेख मोईन (13) अशी आहेत. य तिघी लहुकी नदीत धुणी धुण्यासाठी गेल्या होत्या. या पैकी गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी होत्या.  सायमा त्यांव्या मामाची मुलगी होती. यांच्या सोबत नदीवर गेलेली सिमा शे शब्बीर (13) हिचाही पाण्यात तोल गेला होता मात्र सुदैवाने ती बचावली.