Breaking News

नारायण राणे यांचा निर्णय दस-याला - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि. 28, सप्टेंबर - निर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचाली संदर्भात दस-याच्या दिवशी निर्णय  घेतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा विश्‍वास व्यक्त करत  सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा, अशा दोन्ही भूमिका शिवसेनेला लोकशाहीत घेता येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. 
महसूल मंत्री पाटील म्हणाले, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत घेतलेली भेट ही त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडीकल  कॉलेज संदर्भात होती. साहजिकच दोन राजकीय व्यक्ती एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा होणारच. त्यानुसार झालेल्या राजकीय चर्चेतून एकंदरीत राजकीय बेरीज व  वजाबाकीवर भाजप व त्यांच्याकडून असा दोन्ही बाजूंनी विचार झाला. दोन्ही बाजूंकडून चर्चा झाली असली तरी भाजपाला जे काही सांगायचे आहे ते अमित शहा  यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री राणे यांना यावेळी सांगण्यात आले. यानंतर पुढील जो काही राजकीय निर्णय घ्यायचा आहे. तो त्यांच्यावरच सोपविला आहे. राणे  हे निर्णय घेण्यात अचूक असून ते दसजया दिवशी योग्य निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सांगितले.