Breaking News

पीएमपी कर्मचार्‍यांना यंदा वेळेत बोनस

पुणे, दि. 27, सप्टेंबर - यंदाच्या दिवाळीत पीएमपी कर्मचा-यांना वेळेत बोनस मिळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत  पीएमपी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना बोनससाठी लागणारी रक्कम पीएमपीला अदा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
पीएमपी कर्मचार्‍यांना बोनससाठी प्रत्येक वर्षी आंदोलनाचे अथवा संपचे हत्यार उपसावे लागत होते. यंदा मात्र कर्मचा-यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही.  कारण झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीच्या कर्मचार्‍यांना 8.33 टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदान यासाठी लागणारी रक्कम पीएमपीला अदा करण्याच्या  प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. यामुळे पीएमपीच्या 7000 हजार कर्मचारी आणि 56 अधिकार्‍यांना वेळेत बोनस मिळण्याची शक्यता आहे.