Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी संभाजी कोल्हे

अहमदनगर, दि. 15, सप्टेंबर - भविष्यात पक्ष बांधणी तसेच संघटना बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक गावात कार्यकर्ते तयार करुन परिवर्तनाची लढाई  लढण्यात येणार आहे. तसेच समाजाच्या नावावर शासकीय अधिकार्‍यांना त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त लवकरच करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी केले आहे.
जामखेड तालुका संभाजी ब्रिगेडची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह, जामखेड येथे पार पडली. यावेळी जामखेड तालुका संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी संभाजी  कोल्हे पा. तर शहराध्यक्षपदी योगेश खैरे यांची नियुक्ती करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी मार्गदर्शक प्रा.संभाजी मुळे, संभाजीराजे ढोले,  प्रा.आनंद ढवळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सरपंच विलास पोते, किसन घुमरे, राजु मोरे, मल्हारी सपाफुले, किशोर गायवळ, दिनेश  काळदाते, भाऊ शेळके,पवन रोडे, विठ्ठल कोकाटे आदी उपस्थित होते.
नुतन पदधिकार्‍यांचा सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संभाजी कोल्हे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडने मला जी संधी दिली आहे त्याचे मी  सोने करीन संभाजी ब्रिगेडच्या शाखा ग्राम पातळीवर सुरु करुन विचाराने काम करणारे युवक तयार करणार आहे. नविन सभासद नोंदणी लवकरच सुरु करुन  युवकांना कार्यकारणीत संधी देणार आहे. तसेच संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून युवकांसाठी स्टडी रुम, तसेच युवकांची नवी फळी तयार करण्यासाठी लवकरच सभासद  नोंदनी करण्याचा मानस आहे. तसेच विविध रोजगारांच्या संधी कशा उपलब्ध करुन देता येईल यासठी तज्ञांचे सहकार्य घेऊन युवकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न  करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर निवडीबद्दल सकल मराठा समाजाचे मंगेश दादा आजचे, शे.का.प.चे अवधुत पवार, केमिस्ट असो.अध्यक्ष माऊली (दादा) गायकवाड, डॉ.असो.अध्यक्ष  डॉ.अविनाश पवार, राजुरी सरपंच श्री.सुभाष काळदाते, एस.टी.कामगार सेनेचे नेते बाबासाहे चितळे यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.