Breaking News

रेशनच्या धान्याच्या गोण्या भरून घेवून जाणारा ट्रक पकडला

औरंगाबाद, दि. 28, सप्टेंबर - रेशनच्या धान्याच्या 140 गोण्या भरून अवैधरित्या घेवून जाणारा ट्रक काल मध्यरात्री सिल्लोड पोलिसांनी पकडला. एम एच 19 एन  5225 असा या अयशर ट्रकचा क्रमांक असून जळगाव जिल्हयातील रावेर तालुक्यातील ट्रकचालक गुलाब सईद 26, जुम्मा सुपडू तडवी 29या दोघांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी तपास चालु आहे.