Breaking News

स्वच्छ भारत अभियानात परभणी शहर हागणदारीमुक्त

परभणी, दि. 25, सप्टेंबर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत परभणी शहर हगणदारीमुक्त झाल्याचे अखेर महानगरपालिकेने जाहीर केले आहे. यानंतर पुढच्या टप्प्यात  ओल्या व सुक्या कचजयाचे विलगीकरण करुन त्याचे खत तयार करण्यासाठीच्या दुसजया टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत  परभणी शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून पहिला टप्पा पार  पडला असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. महानगरपालिकेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात परभणी शहर प्रथम टप्प्यात हगणदारीमुक्त झाल्याचे नमूद करण्यात आले  आहे.