Breaking News

इरमा वादळाचा तडाखा बसलेले अनिवासी भारतीय सुरक्षित - सुषमा स्वराज

नवी दिल्ली, दि. 11, सप्टेंबर - इरमा वादळाचा तडाखा बसलेले अनिवासी भारतीय सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. कराकस,हवाना,  जॉर्जटाऊन आणि पोर्ट ऑफ स्पेन येथील भारतीय सुरक्षित असल्याची माहिती तेथील भारतीय दूतावासाने दिल्याचे स्वराज यांनी सांगितले. 
इरमा वादळ, कराकस (व्हेनेझुएलाची राजधानी), हवाना (क्यूबाची राजधानी), जॉर्जटाउन (केमॅन द्वीप) आणि पोर्ट ऑफ स्पेन येथील अमेरिकन भारतीय सुरक्षित  आहेत, अशी माहिती भारतीय दुतावासाने दिल्याचे स्वराज यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले. याआधी येथील भारतीय नागरिकांच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्र  मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. या वादळामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. इरमा वादळ काल क्युबामधील कामुई  आर्किपिलाजो येथे धडकले आहे.