जनता क्रांती दलाचे 11 रोजी उपोषण
सातारा, दि. 11, सप्टेंबर - वडूज येथील तहसिलदार कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार मिना निंबाळकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा व त्यांच्यावर खरीप निधी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जनता क्रांती दलातर्फे सोमवार 11 पासून सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय केंगारे यांनी दिली.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळ निधी घोटाळ्यात शिपायापासून ते तहसिलदारापर्यंत सर्वांचे हात गुंतले आहेत. असे असताना नायब तहसिलदार निंबाळकर या कशा नामानिराळ्या राहतील? त्यामुळे त्यांच्यावरही कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा,अशी मागणी करण्यात आली आहे.